जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाडय़ातील नामांकित शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तर उपाध्यक्षपदी त्यांच्या सौभाग्यवती अमिता यांची बिनविरोध निवड झाली. नव्या कार्यकारिणीत नागपूरचे आनंदराव घारड आणि अनिल पाटील या दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
मराठवाडय़ात ज्या काही शिक्षण संस्था नामांकित मानल्या जातात. त्यापकी कै. शंकरराव चव्हाण यांनी स्थापन केलेली शारदा भवन ही शिक्षण संस्था. या संस्थेचा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला. महाविद्यालये, शाळा, संस्थेने ठिकठिकाणी उभ्या केल्या. आज संस्थेत हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेच्या सभासदांची संख्या सव्वाशेच्या आसपास असली तरी विरोधकांची संख्या अत्यल्प असल्याने या संस्थेवर चव्हाण दाम्पत्याचे वर्चस्व कायम आहे. दोन दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांची अध्यक्षपदी व अमिता चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड होईल हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी दहाजणांचे अर्ज आले होते. अर्ज मागे घेण्याच्या विहित मुदतीत नरेंद्र चव्हाण व अन्य एकाने माघार गेतल्याने आठजणांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. पालकमंत्री व विद्यमान सचिव डी. पी. सावंत, कोषाध्यक्ष गंगाधर शक्करवार, अॅड. उदय िनबाळकर, किशोर पाटील (धुळे), सुभाष कदम, अमित पाटील, माजी प्राचार्य डी. एस. ढेंगळे व आनंदराव घारड यांची बिनविरोध निवड झाल्याचे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. संस्थेची उर्वरित कार्यकारिणी जाहीर झाली नसली तरी पूर्वीच्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्यकारिणीवर काही सदस्य निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत. त्यात कोणाची वर्णी लागते याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे. पूर्वी सचिव या नात्याने पालकमंत्री डी. पी. सावंत संस्थेचा पूर्ण कारभार पाहात होते, पण आता कारभाराच्या चाव्या शिवाजीनगरात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा