महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ठाण्यातील लक्ष्मी पार्क येथील रहिवासी अशोक पालांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
 पवई येथील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीत काम करणारे पालांडे यांना यापूर्वी कामगार गुणवत्तेसंबंधी विशेष सन्माम मिळाले आहेत. अनाथ आश्रमातील मुलांसाठी कार्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अंधश्रद्धा निमूर्लन यासारख्या कार्यातही पालांडे यांचा पुढाकार राहिला आहे.
 राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.