माध्यम एन्टरटेनमेन्टतर्फे ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता नेहरू सेंटरच्या सभागृहात ‘चिरंतन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला एक वेगळा आयाम देणाऱ्या गायिका बेगम परवीन सुलताना, सूरांच्या मैफिलीतील प्रात:स्मरणीय नाव असलेल्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे आणि संतूर वादक पं. सतीश व्यास हे तीन दिग्गज कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गाण्याने होईल. अश्विनीताईंच्या गायनानंतर संतूरवादक पं. सतीश व्यास आपली कला सादर करतील. देशभरातील शास्त्रीय गायकांमध्ये मान असलेल्या बेगम परवीन सुलताना यांच्या गाण्याने ‘चिरंतन’च्या या पर्वाची ‘भैरवी’ सादर होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा