रंगभूमीचा पाया समजला जाणाऱ्या एकांकिका या नाटय़प्रकारात मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत असतात. या प्रयोगांचे मूल्यमापन एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून होत असते. ‘स्पर्धा’ आली की टोकाचा संघर्ष हा अपरिहार्यच. त्यामुळे एकांकिका क्षेत्रातल्या सृजनशील मंडळीमध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो. वर्षभरातल्या सर्वोत्तमांच्याही स्पर्धा भरवल्या जातात. पण तिथे ही दुफळी अधिकच वाढते. याचा विचार करून या सर्व नव्या दमाच्या रंगकर्मीना एकत्र आणून स्पध्रेशिवाय त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा खेळीमेळीच्या वातावरणात आढावा घ्यावा, या हेतूने ‘अस्तित्व’ संस्थेतर्फे दरवर्षी पारंगत सन्मानसंध्येचे आयोजन केले जाते. यंदा पारंगत सन्मानांचे पाचवे वर्ष असून गेली चार वर्षे या पुरस्कारांवर नाव कोरणारी सर्वच मंडळी सिनेमा, मालिका, नाटय़क्षेत्रात पारंगत ठरली आहेत. यंदा पारंगत सन्मानसंध्येचे आयोजन शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. या पारंगत सन्मान पुरस्कारांसाठी १ फेब्रुवारी २०१२ ते ३१ जानेवारी २०१३ यादरम्यान विविध स्पर्धामध्ये प्रथम पुरस्कारप्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक पारितोषिकप्राप्त कलावंत आणि तंत्रज्ञ पात्र असतील. या पुरस्कारांचे प्रवेश अर्ज www.astitva.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८२१०४४८६२. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी ही आहे. पुरस्कारांची नामांकने १८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा