बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध कंपन्यांची मोबाईलची सीमकार्ड विकणाऱ्या एका विक्रेत्याला दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. न्यायालयाने या आरोपीला १४ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गणपत दामोदर गर्ग (वय ४२, रा. आदर्शनगर, दिघी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गर्ग याच्याकडून मोबाईल कंपनीची ५० सीमकार्ड, २५ जणांची छायाचित्रे व या मंडळींच्या मतदार ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती जप्त करण्यात आल्या आहेत. दिघी परिसरामध्ये हरी ओम सेल्स व नरसिम्हा सेल्स या नावाची दुकाने आहेत. गर्ग हा मागील दोन वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्डची विक्री करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनाही अशी सीमकार्ड विकले असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे हा गुन्हा गंभीर असून, गर्गने ही छायाचित्र कोठून मिळविली, त्याचप्रमाणे त्याने विकलेल्या सीमकार्डचा कुठे गैरवापर झाला आहे का, हे पाहण्यासाठी सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी मान्य करीत न्यायालयाने त्याला १४ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.    

Story img Loader