सोलापूर जिल्हय़ात ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या आंदोलनाची ठिणगी पेटली असतानाच कुर्डूवाडी येथे संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांच्या कार्यालयावर साखरसम्राटांच्या चिथावणीवरून हल्ला करण्यात आला. या वेळी घाटणेकर यांना बेदम मारहाण झाली. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
घाटणेकर हे कुर्डूवाडी येथे आपल्या कार्यालयात दुपारी १२.३०च्या सुमारास आपले सहकारी शिवाजी पाटील, मारुती नलावडे, बापू लोकरे, अशोक पवार यांच्यासह चर्चा करीत बसले असताना अचानकपणे आलेल्या एका जमावाने कार्यालयावर हल्ला केला. गांधीगिरी करून साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करतोस काय, असे म्हणून या जमावातील दोघा-तिघाजणांनी घाटणेकर यांना बेदम मारहाण केली. यात त्यांना बरीच दुखापत झाली. या जमावाने कार्यालयाची मोठय़ा प्रमाणात मोडतोड केल्याचे घाटणेकर यांनी सांगितले. माढा तालुक्यातील साखरसम्राटांच्या चिथावणीमुळेच आपल्या कार्यालयावर हल्ला करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा