पावसाला दमदार सुरुवात झाली असून मोडकळीस आलेल्या इमारती, सखल भागातील चाळी, बैठी घरे, झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे. सखल भागातील वीज वितरण केबीन आणि तारखंडांमधून पडणाऱ्या ठिणग्यांपासून दूर राहावे आणि त्याबाबत ‘बेस्ट’ उपक्रमाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. अशा वेळी काही नागरिक ‘बेस्ट’च्या विद्युतपुरवठा विभागाचे कर्मचारी येण्यापूर्वीच कामचलाऊ इलेक्ट्रिशियनच्या मदतीने वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्यात असे करणे धोक्याचे असून त्यामुळे विजेचा झटका बसू शकतो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ ‘बेस्ट’च्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.
‘बेस्ट’ उपक्रमाने ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी २४ तास कॉल सेंटर सुरू केले असून ते सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. कुलाब्यापासून शीव, माहीमपर्यंतच्या संगणकीकृत माहिती उपलब्ध असलेल्या ९.७ लाख वीज ग्राहकांची माहिती या कॉल सेंटरकडे आहे. या कॉल सेंटरवर तक्रार करण्यासाठी वीज ग्राहक क्रमांक अथवा वीज मानक (मीटर) क्रमांक नोंदवावा. त्यामुळे तक्रारीचे जलदगतीने निवारण करणे बेस्ट कर्मचाऱ्यांना सहज शक्य होईल. आग लागणे, विजेचा झटका बसणे, ठिणग्या उडणे आदी स्वरूपाच्या तक्रारीसाठी नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक २२८४३९३९ वर संपर्क साधावा.
पावसाळा सुरू झाला वीज ग्राहकांनो सावधान..!
पावसाला दमदार सुरुवात झाली असून मोडकळीस आलेल्या इमारती, सखल भागातील चाळी, बैठी घरे, झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे. सखल भागातील वीज वितरण केबीन आणि
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-06-2013 at 08:39 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attention electricity consumers the rainy season starts