‘हॅपी जर्नी’ या आगामी मराठी चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेता कलावंत अतुल कुलकर्णी आणि ‘काकस्पर्श’मधील अभिनयाचे कौतुक झालेली अभिनेत्री प्रिया बापट प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘गंध’, ‘अय्या’, ‘रेस्टॉरण्ट’ या चित्रपटांचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ही अनोखी जोडी हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ असून पुणे आणि गोवा येथे चित्रपट चित्रित केला जाणार आहे. तरुणाईची मानसिकता, स्टाइल असलेला हा चित्रपट सर्वतोपरीने नव्या पद्धतीचा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. ‘एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट’चे प्रमुख व चित्रपट निर्माते संजय छाब्रिया यांचा हा नवा चित्रपट असून लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाणार आहे. तीन मध्यवर्ती भूमिकांचा हा चित्रपट असून आजच्या काळातील तरुणाईची स्पंदने टिपेल अशा पद्धतीचे कथानक असेल, असा दावा छाब्रिया यांनी केला आहे. तिसऱ्या महत्त्वाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेसाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण याच महिन्यात सुरू केले जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा