येथील जय महाकाली शिक्षणसंस्थेतर्फे  आयोजित हास्यव्यंग कविसंमेलनात देशभरातून आलेल्या कवींनी सादर केलेले काव्य रसिकांना मनमुरादपणे हसवून गेले.
मकरसंक्रांत व स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्याने या उपक्रमाचे आयोजन संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. दिल्लीचे कवी आशुतोष त्रिपाठी यांनी महात्मा गांधींच्या चरित्रावर कविता सादर केली. ओज रसावर आधारलेल्या या काव्यातून ते म्हणाले की, गांधी ही एक केवळ प्रतिमा नव्हे. ते एक महानुभव होय, तर स्वामी विवेकानंद यांनी विश्वपटलावर भारताचे नाव कोरले. अरुण जैमिनी (इंदौर) यांनी सैनिकांच्या त्यागावर काव्य सादर केले. मुंबईचे हास्यकवी आशकरण अटल यांनी टी.व्ही.मालिकांवर व्यंग केले. लखनौच्या गझलगायिका डॉ.सुमन दुबे यांनी प्रेमरसमय काव्याने उपस्थितांना भावविभोर केले.  कटनीचे कवी मनोहर मनुज रेल्वे प्रवासातील घटनांवर भाष्य क रणारी, रेल्वे मॅनिया व पत्नी फ ोबिया, ही कविता सादर केली. प्रा.मधूप पांडेय यांनीही हास्यव्यंग काव्य सादर करीत श्रोत्यांना पोट धरून हसविले.  संस्थाध्यक्ष अग्निहोत्री यांनी सर्व कवींचा शाल-श्रीफ ळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन श्रीकांत नायक व डॉ. अशोक जैन यांनी केले. या हास्यसंमेलनाचा खासदार दत्ता मेघे, माजी नगराध्यक्ष धून्नू महाराज व अन्य मान्यवरांनी पूर्णवेळ बसून आनंद घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा