महापालिकेच्या श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील कर्मचारी तसेच शिक्षकांसाठी समूह विमा योजनेंतर्गत एक वर्षांसाठी अपघात विमा संरक्षण योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार १९९ कर्मचारी व शिक्षकांना लाभ मिळणार आहे.
या योजनेत १४ लाख ५७ हजार ५३४ रुपये भारतीय आयुर्विमा महामंडळास अदा करण्याचे महापालिकेने ठरविले आहे.
१ नोव्हेंबर २०१२ ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीसाठी ही योजना आहे.
चालू वर्षांच्या अर्थसंकल्पातील तरतुदीतून या हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ १३३ अधिकारी, तसेच १ हजार ६६ कर्मचारी-शिक्षक अशा १ हजार १९९ जणांना मिळणार आहे. वर्ग-१ व वर्ग-२ या श्रेणीमधील कोणाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३ लाखांचे विमा संरक्षण असून अपघाती मृत्यू झाल्यास ६ लाख रकमेचे विमा संरक्षण मिळेल. वर्ग ३ श्रेणीमध्ये नैसर्गिक मृत्यूसाठी २ लाख, तर अपघाती मृत्यू झाल्यास ४ लाख रकमेचे विमा संरक्षण मिळेल.
वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना यापूर्वीच विमा संरक्षण दिले आहे. त्याची मुदत डिसेंबपर्यंत असून येत्या जानेवारीपासून या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वरील योजनेत सामावून घेतले जाणार आहे.
या योजना दिवाळीपूर्वी लागू करण्यासाठी स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनी प्रयत्न केले. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व विमा कंपनीचे अधिकारी यांच्यात समन्वय साधून या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा