मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या १८व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, ६ रौप्य व १ कांस्य पदकांची कमाई केली. वरिष्ठ व कनिष्ठ गटांत झालेल्या या स्पर्धेत औरंगाबादचे २३ खेळाडू सहभागी झाले होते.
सुवर्णपदक विजेते खेळाडू (एकेरी) – सर्वेश भाले,  गौरव जोगदंड, अरुंधती बोठारे, शर्वरी लिमये, आयुषी अल्वा. रौप्यपदक विजेते खेळाडू – सिद्धार्थ कदम, निशा तांदळे (दुहेरी), राहुल श्रीरामवार, विवेक देशपांडे, सर्वेश भाले (तिहेरी), सिद्धार्थ कदम, राहुल श्रीरामवार, सर्वेश भाले, विवेक देशपांडे, मयुर बोठारे, रोहन श्रीरामवार (सांघिक), गौरव जोगदंडे, आदित्य तळेगावकर, सुजय देवळे (कनिष्ठ गट, तिहेरी), अरुंधती बोठारे (एकेरी), ध्रुव देशपांडे (एकेरी). कांस्यपदक विजेते खेळाडू – ऋग्वेद जोशी (एकेरी).
डॉ. मकरंद जोशी व आदित्य जोशी यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे सुधीरदादा जोशी, राम पातूरकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अॅड. संकर्षण जोशी आदींनी अभिनंदन केले.

Story img Loader