पदवीधरांचा भरणा अधिक, २६ फेब्रुवारीला सोडत
आरटीओने ऑटोरिक्षाचे परवाने देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून पावणेदोन लाखांपेक्षा अधिक अर्ज विभागाकडे आले आहेत. राज्यभरातून चार हजारपेक्षा अधिक पदवीधर, तर ४१३ पदव्युत्तर युवकांनी परमिटसाठी अर्ज केले आहेत. यात नवी मुंबईतील १५६ पदवीधारकांचा समावेश आहे. नवी मुंबई आरटीओकडे ७६५५ अर्ज आले असून ६८४९ एवढय़ा अर्जदारांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यापैकी पाच हजारांहून अधिक अर्ज पात्र आहेत. फक्त २६८७ जणांनाच भाग्यवान सोडतीच्या माध्यमातून परवान्याचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती नवी मुंबई आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली. सोडत प्रक्रिया २६ फेब्रुवारीला मुंबई येथे होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा