पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात प्रतीक्षा यादीची स्थिती दाखविणारी यंत्रणा लावली असून प्रवाशांना आता आरक्षणाची स्थिती सहज समजू शकेल. त्याचप्रमाणे आरक्षण, प्रवास भाडे आणि जागेची स्थिती याबाबतची माहिती देणारे टर्मिनलही बसविण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटीवरही अशाप्रकारची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे.
मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची प्रतीक्षा स्थिती दाखविण्यासाठी सात एलईडी टीव्ही लावण्यात आले आहेत. या टीव्हींवर एकावेळी चार गाडय़ांच्या प्रतीक्षा याद्या दिसतील. हिरवा, लाल आणि पिवळा अशा रंगात ही स्थिती दिसेल. प्रतीक्षा यादीवरील एखाद्या तिकिटाचे आरक्षण निश्चित झाले की त्याच्या तिकिटाचा पीएनआर क्रमांक हिरव्या अक्षरात प्रदर्शित होईल. आरएसीमधील तिकिटाचा क्रमांक पिवळ्या तर प्रतीक्षेतच असलेल्या तिकिटाचा क्रमांक लाल अक्षरात दिसेल.
त्याचबरोबर प्रवाशांना आरक्षणाबाबतची माहिती देणारे ‘टच स्क्रीन’ टर्मिनलही लावण्यात आले आहेत. हे टर्मिनल प्रवासी आरक्षण केंद्राला जोडण्यात आले आहे. यावर इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये तिकिटाची स्थिती, प्रवासाचे भाडे तसेच किती जागा उपलब्ध आहेत, हे समजू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा