पारनेरच्या सरपंचपदी अण्णासाहेब औटी यांची, तर उपसरपंचपदी नंदकुमार ऊर्फ संदीप देशमुख यांची आज बिनविरोध निवड झाली़  करंदी, म्हस्केवाडी, पिंपळगाव तुर्क व कोहकडी येथील सरपंच-उपसरपंच पदासाठीही आज निवड झाली.
पारनेरमध्ये आमदार विजय औटी यांच्या विकास मंडळाला १४ सदस्यांसह स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी परिवर्तन मंडळास तीन जागा मिळाल्या. आज सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आमदार औटी समर्थक औटी व देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.
सकाळी आ. औटी यांनी सर्व सदस्यांशी चर्चा केल्यानंतर औटी व देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीस अनिकेत औटी, शाहीर गायकवाड उपस्थित होते. आ. औटी यांनी बंद पाकिटातून उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली. राजेंद्र तारडे व कल्पना शिंदे यांनी दोघांच्या अर्जावर सूचक म्हणून सह्य़ा केल्या.
विरोधी परिवर्तन मंडळाच्या विजेता सोबले व प्रतिभा मते यांनी अर्ज दाखल केले, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत त्यांनी आपले आर्ज मागे घेतल्याने विकास मंडळाच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडीनंतर आमदार औटी यांनी सरपंच उपसरपंचांचा सत्कार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडीनंतर जल्लोष करण्यास आ. औटी यांनी मनाई केली.
तालुक्यातील इतर गावांच्या सरपंच-उपसरपंचांची नावे पुढीलप्रमाणे :- करंदी- वैशाली उघडे व सुनील ठाणगे, म्हस्केवाडी- वैशाली म्हस्के व डॉ. किरण पानमंद, पिंपळगावतुर्क- अर्चना वाळुंज व धोंडिभाऊ वाळुंज, कोहकडी- सीमा पवार व दत्तात्रय टोणगे.

Story img Loader