नवी पेठ मंडळ , ओसवाल पंचायत सभेचा उपक्रम
काही वर्षांपुर्वी हाताच्या बोटावर इतकेच विद्यार्थी चार्टड अकौंटंटची (सी. ए.) परिक्षा उत्तीर्ण व्हायचे. आता स्पर्धात्मक युगात परिश्रमपुर्वक यश मिळवणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढते आहे, त्यात नगरही मागे नाही हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
नवी पेठेतील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने सी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नगरमधील १६ विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. जैन ओसवाल युवक पंचायत सभेनेही या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेत बोलावून त्यांना खास सत्कार केला. नवी पेठेतील कार्यक्रमात खासदार गांधी यांच्या समवेत उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ. एम. बी. मेहता, दिपक गांधी, विक्रम फिरोदिया, अश्विन कटारिया, आकाश बोकाडिया, सुरेखा बोरा आदी उपस्थित होते.
अर्शिन मेहता, रचना मुथियान, श्रेणिक मेहेर, आनंद मुथा, अमित फिरोदिया, निकिता भंडारी, वृषाली चौधरी, मुग्धा धर्माधिकारी, श्रद्धा कोठडिया, प्रसाद घोलप, गणेश कदम, नेहा कटारिया, सोहन गुगळे, प्रतिक कासट, धिरज मुथा, राहूल आमले, रुपेश देसर्डा, प्रिती गांधी, लिला पंजवानी यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी प्रास्तविक केले. सचिव मनोज गुंदेचा यांनी आभार मानले.
जैन ओसवाल पंचायत सभेच्या कार्यक्रमाला सी. ए. रविंद्र कटारिया, सी. ए. असोसिएशनचे अध्यक्ष विजय मर्दा, राजेंद्र चोपडा, सिद्धार्थ कटारिया, डॉ. एम. बी. मेहता, विलास लोढा, राजेंद्र चोपडा आदी उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष संजय चोपडा यांनी सर्वाचे स्वागत केले. सर्वानी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढच्या काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जवाहर कटारिया यांनी सुत्रसंचालन केले. संपत बाफना यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा