शिक्षण मंडळ कराडतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर झाले. गुरुपौर्णिमेदिनी सोमवारी (दि. २२) गुरुगौरव कार्यक्रमात या पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण होणार आहे.
संस्थेतर्फे देण्यात येणारा डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एच. पवार यांना, साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे येथील शामराव दत्तात्रय घळसासी यांना, आदर्श शिक्षिका पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील हायस्कूलच्या पर्यवेक्षक संगीता हातगिणे यांना, आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार येथील प्रकाश खोचीकर यांना, आदर्श प्राध्यापक पुरस्कार येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. एच. जगदाळे यांना, उत्कृष्ट नाटय़कर्मी पुरस्कार पुणे येथील नयना कुलकर्णी यांना, आदर्श शिक्षक पुरस्कार ओगलेवाडी येथील आत्माराम विद्यामंदिराचे पर्यवेक्षक अनिल भुतकर यांना, प्राथमिक विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार उषा राव यांना, उत्तम सेवक पुरस्कार राजश्री कुंभार यांना तर साने गुरूजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शर्मिला पाटोळे यांना जाहीर झाला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील लाहोटी कन्याप्रशालेत होणाऱ्या गुरुगौरव कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होईल. कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एच. पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा