शाहू मिलच्या जागेत राजर्ष िशाहू महाराज यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाचा प्रकल्प आराखडा बनविण्यासाठी तज्ज्ञ वास्तुशिल्पींकडून आराखडा बनवून घेतला जाणार आहे. उत्कृष्ट आराखडय़ास ७ लाख रुपये व आवश्यक वाटल्यास द्वितीय प्रकल्प आराखडय़ास ३ लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. या आशयाचा ठराव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती राजेश लाटकर होते.
नगरोत्थान कामामध्ये जाचक अटी घातल्या आहेत. अशी तक्रार मधुकर रामाणे यांनी केली. तर स्थानिक कंत्राटदारांना काम करता येऊ नये अशा अटी घालण्यात आली असल्याचे सत्यजित कदम, राजू घोरपडे यांनी निदर्शनास आणून दिले. यावर सभापती लाटकर यांनी त्री-बीड मध्ये जाचक अटींमध्ये सुधारणा करण्यात येईल असे स्पष्ट केले.
गुंठेवारीमध्ये येणाऱ्या अडचणींची मांडणी सतीश लोळगे, घोरपडे व कदम यांनी कथन केल्या. सभापती लाटकर यांनी यासाठी प्रभागनिहाय शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले तर प्रशासनाच्य वतीने शासन निर्णयात बदल झाल्याने गुंठेवारीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती निकाली काढण्यात येईल असे स्पष्ट केले. सुभाष रामुगडे यांनी िबदू चौकातील सुशोभीकरणाचा प्रश्न उपस्थितीत केला.