जिल्हय़ातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या वर्षी दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण केले. मागील दोन वर्षांपासून पुरस्कार दिले नसल्याने त्या पुरस्कारांचे वितरण सोमवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या करण्यात आले.
वसमतच्या अन्नपूर्णा इंडस्ट्रिजला २०१०चा, तर हिंगोलीच्या सोनी फुडला २०११चा प्रथम पुरस्कार मिळाला. मागील वर्षी २८ मार्च रोजी जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत २०१०साठी, तर ९ जुलैच्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत २०११च्या पुरस्कारांची निवड करण्यात आली. सन २०१०साठीचा द्वितीय पुरस्कार हिंगोलीच्या अॅग्रो इंडस्ट्रिजला व २०११साठीचा द्वितीय पुरस्कार वसमतच्या भूमी इंडस्ट्रिजला मिळाला.
जिल्हय़ासाठी कायमस्वरूपी महाव्यवस्थापक अजूनही नसल्यामुळे कधी नांदेड, तर कधी परभणीचे महाव्यवस्थापक त्यांच्या सवलतीप्रमाणे हिंगोलीचा कारभार पाहतात. त्यामुळे पुरस्कार वितरणास वेळ लागला असल्याचे समजते. जिल्हाधिकारी पोयाम यांनी पुरस्कार वितरणाच्या वेळी उद्योजकांचे अभिनंदन केले. या वेळी राम देवडा, ममता राजकुमार अग्रवाल, रमेश पंडित, अतिश दांडेगावकर, प्रवीण सोनी आदी उपस्थित होते.   

Story img Loader