बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार रमेश जाधव, सीताराम लांडगे (पुढारी), ओमप्रकाश लटपटे व विजयसिंह होलम (सकाळ), पराग पोतदार (लोकमत), सोमनाथ साळुंके व मारुती राशिनकर (पुण्यनगरी), शिवाजी शिर्के (देशदूत), दीपक कांबळे (दिव्य मराठी), अतुल परदेशी (गावकरी) आणि नंदकुमार सुंदे यांना जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचाही गौरव करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात सिने क्षेत्रातील रमेश व सीमा देव, शिवाजी साटम तसेच, अप्पा परांडे, अ‍ॅड. संभाजीराजे थोरवे, अ‍ॅड. दिलीप जगताप, अभिनेत्री मोहिनी कुलकर्णी आणि अभिनेता संग्राम साळवी, निर्माता विश्वजित गायकवाड यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत येत्या ७ जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Story img Loader