मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे देण्यात येणारा जयवंत दळवी पुरस्कार दादर येथील एका कार्यक्रमात ज्येष्ठ कथाकार आणि समिक्षिका प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या हस्ते आनंद जातेगावकर यांना प्रदान करण्यात आला.  सन्मानचिन्ह आणि रोख ११ हजार १११ रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या वेळी मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे, समीक्षक संजय भास्कर जोशी, परीक्षक समितीचे सदस्य प्रा. जयप्रकाश लब्धे उपस्थित होते. आनंद जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी प्रत्येक वाचनानंतर वेगवेगळे अर्थ लावण्यासाठी वाचकांना प्रवृत्त करते.   असे प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख वक्ते म्हणून समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी तसेच निवड समितीच्या सदस्यांच्या वतीने प्रा. लब्धे यांनी आपले विचार मांडले. मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा