दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सतर्फे २०१२-१३ या वर्षांत प्रकाशित झालेल्या साकेत प्रकाशनच्या तीन पुस्तकांना उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशभरातील १ हजार ३७८ पुस्तकांच्या प्रवेशिकांमधून या पुस्तकांची निवड करण्यात आली.
नॅशनल बुक ट्रस्टचे माजी अध्यक्ष बी. के. शर्मा यांच्या हस्ते साकेत भांड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे अध्यक्ष सुधीर मल्होत्रा, अशोक गुप्ता उपस्थित होते. पुरस्कार निवड समितीत साहित्य अकादमीचे माजी संपादक निर्मल कांती भट्टाचार्य, भारतीय जनसंवाद संस्थेचे प्रा. एम. के. सरकार, दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे माजी अध्यक्ष व्ही. के. मलिक, प्राचार्य डॉ. इंद्रजित या परीक्षकांचा समावेश होता.
‘निवडक कन्नड कथा’ या पुस्तकास पेपरबॅकसाठी प्रथम, ‘मनोरुग्णांच्या सत्यकथा’ या पुस्तकास अनुवादासाठी द्वितीय क्रमांक व ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या पुस्तकास शैक्षणिक विभागासाठीचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा