स्पध्रेच्या युगात चिंतेचे प्रमाण वाढत चाललेले असून लोकांचे मानसिक आरोग्य ढासळत आहे. मानसिक रुग्णांची वाढती संख्या ही जागतिक समस्या बनत आहे. अशा वेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने मानसिक आरोग्याबाबतची जाणीव जागृकता निर्माण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन न्या. डी. के. अनभुले यांनी केले.
एसआरएम कॉलेज ऑफ सोशल वर्क, रुग्णालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ मेंटल हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या मानसिक आरोग्य सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील साकुरे, तर सप्ताह समन्वयक प्रा. जयश्री कापसे, प्रा. देवेंद्र बोरकुटे व्यासपीठावर उपस्थित होते.
जागतिक पातळीवर मानसिक आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर्षी वैफल्य ग्रस्तता एक जागतिक संकट या घोषवाक्याच्या अनुषंगाने सप्ताहात विविध उपक्रम घेण्यात आले. यात आयएमए व समाजकार्य महाविद्यालयात सद्यस्थितीत जागतिक व भारतातील मानसिक आजारांची सांख्यिकीय स्थिती व त्याची कारणे याबाबत प्रा. जयश्री कापसे यांनी विवेचन केले. याप्रसंगी डॉ. विवेक बांबोळे, डॉ. कुंभारे, डॉ. किरण देशपांडे, डॉ. विद्या बांगडे, प्रा. देवेंद्र बोरकुटे, संजय जाधव, चव्हाण, सी. एम. मेश्राम, भीमलाल साव यांनीही मार्गदर्शन केले.
या सप्ताहासाठी महाविद्यालयातील राहुल कनकनलावार, विक्रम बोधे, गिरीष राऊत, कार्तिक रॉचेर्लावार, मेघा खारीकर, झाबू झोडे, सुरेश मेश्राम यांनी परिश्रम घेतले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा