मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी वाराणसीच्या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्‍सचे महाव्यवस्थापक बी. पी. खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुरकीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतलेले बी. पी. खेर नोव्हेंबर १९७७ मध्ये मध्य रेल्वेच्या सेवेत दाखल झाले. जबलपूर येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर यासह अनेक महत्त्वाची पदे त्यांनी ३५ वर्षांंच्या सेवेत भूषवली आहेत. उत्तर रेल्वेच्या जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख रेल्वे प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी कामगिरी पार पाडली आहे. उत्तर-मध्य रेल्वे आणि पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा