ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव समिती व बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभा यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ जानेवारीला बल्लारपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
येत्या १८ जानेवारीला बाबा फरीद शहा यांचा संदल, महात्मा गांधी संकुल ते शहा दग्र्यापर्यंत या वेळी कौमी एकता महासंमेलनाचे औचित्य साधून सायंकाळी ६ वाजता फरीद शहा दर्गा येथे दुय्यम कव्वालीचा सामना छोटा मजिद शोला विरुद्ध रुख्साना परवीन यांच्यात होईल. तर १९ जानेवारी सकाळी ८ ते १० पर्यंत मॅराथॉन स्पर्धा विविध गटांकरिता असून ज्येष्ठ नागरिक महिला, पुरुष मॅराथॉन दौड गांधी चौक ते श्रमिक भवनापर्यंत होईल. भव्य आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची नि:शुल्क तपासणी करण्यात येणार आहे. पेपरमिल मजदूर सभेच्या वतीने राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांची नोंदणी, तपासणी, उपचार व औषधांचे वितरण करण्यात येईल.
बल्लारपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नगर परिषदेतर्फे नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या इमारतीचे, खनिज शहर विकास निधी, माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या प्रयत्नाने बल्लारपूर नगर परिषदेला २ कोटी रुपये, रस्ते निर्माणाकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून दिलेल्या रस्ते निर्माण बांधकामाचे भूमिपूजन व आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते होईल. कोल इंडियाच्या वतीने नरेश पुगलिया यांनी विसापूर ग्रा.पं. क्षेत्रातील विविध रस्ते व नाली बांधकामाकरिता २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. क्रीडांगण निर्मितीचे काम थंडबस्त्यात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. विसापूर, नांदगाव, चंद्रपूरकडे जाणारा डांबरी रस्ता निर्माणाकरिता, झोपडपट्टी, अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे वितरण, नगरपरिषदेअंतर्गत क्षेत्रातील ७ उद्याने दुरुस्ती, खांडक्या बल्लारशाह समाधीस्थळ परिसरात नगरपरिषदेद्वारे उद्यान व पेपरमिल मजदूर सभेद्वारे वाचनालयाची निर्मिती करण्यात येईल. याप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया, नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, गजानन गावंडे, राहुल पुगलिया, वसंत मांढरे, तारासिंग कलसी, नगरसेवक भास्कर माकोडे, अनिल वर्मा, रामदास वागदरकर, रामभाऊ टोंगे, टी. पद्माराव उपस्थित होते.

Story img Loader