सासवड येथे १३ ऑगस्टला होणाऱ्या आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (पुणे) रावसाहेब पवार यांनी दिली. बाबा भांड गेली ३८ वर्षे लेखन-प्रकाशन क्षेत्रात असून आतापर्यंत ९ कादंबऱ्या, ४ प्रवासवर्णने, २ कथासंग्रह, ४ ललित गद्य, ४ अनुवाद, १४ किशोर कादंबऱ्या मिळून ८०हून अधिक पुस्तके प्रकाशिक केली आहेत. साकेत प्रकाशनाने दीड हजारांहून अधिक पुस्तकांचे प्रकाशन केले. लेखनासोबत प्रवास व छायाचित्रण छंदही भांड यांनी जोपासला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba bhand appointed to president of atre sahitya sammelan