भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बाबाराव बांगर यांची फेरनिवड करण्यात आली.या पदासाठी निवडणुकीत ९ उमेदवार रिंगणात होते. खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्तक्षेपामुळे बांगर यांची या पदावर फेरनिवड झाली. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी शासकीय विश्रामगृहावर भाजपा पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. निवडणूक अधिकारी शिरीष बोराळकर, संघटनमंत्री रेणुकादास देशमुख या वेळी उपस्थित होते.
अध्यक्षपदासाठी वसमतचे शिवदास बोड्डेवार, माजी जिल्हाध्यक्ष तानाजी मुटकुळे, अॅड. प्रभाकर भाकरे, रामरतन शिंदे, औंढय़ाचे सुरजीतसिंग ठाकूर, शंकर बोरुडे व गोवर्धन वीरकुंवर, बाबाराव बांगर या नऊ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, या साठी बोराळकर यांनी प्रयत्न केले. परंतु नऊ जणांपैकी कोणीच माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर बोराळकर यांनी खासदार मुंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांना माहिती दिली. मुंडे यांनी बांगर यांचेच नाव सुचविल्यामुळे त्यांची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी बाबाराव बांगर यांची फेरनिवड
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बाबाराव बांगर यांची फेरनिवड करण्यात आली.या पदासाठी निवडणुकीत ९ उमेदवार रिंगणात होते. खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्तक्षेपामुळे बांगर यांची या पदावर फेरनिवड झाली. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी शासकीय विश्रामगृहावर भाजपा पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली.
आणखी वाचा
First published on: 05-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babarao bangar reelected as district president of bjp