जुने नाशिक परिसरात सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने परिसरात दरुगधीचे साम्राज्य पसरले असून त्वरित स्वच्छता करण्यात यावी, तसेच वीज व पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी विभागीय अधिकारी (पूर्व विभाग) यांना बहुजन स्वराज महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जुने नाशिक परिसरात शौचालयांची बहुतांश दरवाजे तुटली आहेत. शौचालयांच्या टाकीच्या ढाप्यांचेही नुकसान झाले आहे, तर काही गायब आहेत. रात्री अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे काही जण बाहेरच्या मोकळ्या जागेतच शौचास बसतात. त्यामुळे परिसरातील अस्वच्छतेत अधिकच भर पडते. १० वर्षांपासून परिसरात नवीन शौचालयांचे बांधकाम झालेले नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार परिसरात नवीन शौचालयांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन शौचालयाची दुरुस्ती करावी, शौचालयाच्या टाकीचे ढापे दुरुस्त करावेत, बल्बची व्यवस्था व्हावी, अशा मागण्या महासंघाच्या वतीने मांडण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास बहुजन स्वराज महासंघाच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा