नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित निवड चाचणी स्पर्धेचा बक्षीस सोहळा नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
शहरातील औद्योगिक कारखान्यांमध्ये असलेल्या खेळाडूंसाठी स्पर्धा व मार्गदर्शन वर्ग सुरू केल्यास अनेक नवीन खेळाडू आपल्याला मिळू शकतील, अशी अपेक्षा बेळे यांनी व्यक्त केली. प्रस्तावना संघटनेचे सचिव अनंत जोशी यांनी केले, तर संघटनेचे अध्यक्ष एस. राजन यांनी संघटनेच्या आगामी योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन अनंत जोशी यांनी केले. योगेश एकबोटे यांनी आभार मानले. राज्य संघटनेवर निवड झाल्याबद्दल डॉ. शर्मिला कुलकर्णी, एस. राजन, संजय सोनवणे यांनाही सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचा निकाल- १० वर्षांआतील गट खुशी घरटे व गहिर जगतर, १३ वर्षांआतील गटात स्मित तोष्णिवाल व वेदांत काळे, १५ आणि १७ वर्षांआतील गटात वैदेही चौधरी व अजिंक्य पाथरकर, दुहेरीत श्रीपाद कुलकर्णी व रोहित उफाडे, १९ वर्षांआतील दुहेरीत श्रीपाद कुलकर्णी व रोहित उफाडे, पुरुष एकेरीत विनायक दंडवते, पुरुष दुहेरीत पराग एकांडे व विक्रांत करंजकर, ४० वर्षांवरील दुहेरीत संजय म्हात्रे व अनंत जोशी यांनी विजेतेपद मिळविले.

Story img Loader