येथील वाळूज एमआयडीसीतील टायर तयार करणाऱ्या बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. कंपनीने कारखान्यात वेगवेगळे उपक्रम राबवून ऊर्जा बचत केली. या उपक्रमांची दखल घेत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण समितीने घेऊन यंदाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार त्यांना जाहीर केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ऊर्जादिनी पुरस्काराचे वितरण झाले. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कल्लोल सिन्हा रे यांनी पुरस्कार स्वीकारला. कंपनीचे अधिकारी के. व्यंकटरामन, एस. एन. पांचाळ, आर. के. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा