औरंगाबाद येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये आयोजिलेल्या राज्य अजिंक्यपद पुरुष व महिला खो-खो स्पर्धेदरम्यान अचानक परत आलेल्या सांगोल्याच्या यशराजे क्रीडा मंडळाच्या तिघा खेळाडूंवर ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत जिल्हा संघटनेच्या स्पर्धा खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शाहरूख मुजावर, अजय शेळके व विकास जानकर अशी बंदी घालण्यात आलेल्या तिघा खो-खो खेळाडूंची नावे आहेत. याशिवाय यशराज क्रीडा मंडळाने स्पर्धा आयोजित केल्याचे शुल्क जमा करेपर्यंत संबंधित संघासही कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित खेळाडू व मंडळाला लेखी खुलासा करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताही खुलासा न केल्यामुळे सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत ढेपे यांनी सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष महेश गादेकर होते.

Story img Loader