मधुमेहासाठी सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या पीओग्लिट्झोनस, एॅनल्जिन आणि डेनझिट या गोळ्यांच्या उत्पादन तथा विक्रीवर केंद्र सरकारने पूर्णत: बंदी घातली आहे. या गोळ्यांमुळे मधुमेहाच्या रुग्णांना कर्करोग व हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याची भीती असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोलापुरातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. भास्कर पाटील यांनी या निर्णयाबद्दल दुजोरा देत रुग्णांनी या गोळ्या सेवन करण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.
पीओग्लिट्झोन या गोळीमुळे हृदय बंद पडण्याची तसेच मूत्राशयातील कर्करोगाची भीती असते. वेदनाशामक एॅनल्जिन ही गोळी तर जागतिक स्तरावर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमधून यापूर्वीच हद्दपार झाली आहे. तर डेन्मार्कमध्ये उत्पादित होणाऱ्या डेनझिट या हानीकारक गोळीवर त्या देशाने बंदी घातली आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांनी या हानीकारक औषधगोळ्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे.
ड्रग्ज अॅन्ड कॉस्मॅटिक कायदा १९४० अन्वये (कलम २६ अ) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तिन्ही गोळ्यांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात संबंधित औषध उत्पादक कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पीओग्लिट्झोन ही गोळी व तिच्या कॉम्बिनेशनवर बंदी आल्याने सुमारे ७०० कोटींची उलाढाल होणार असल्याचे सांगण्यात येते. त्याचा फटका प्रामुख्याने अबोट, सन फार्मा, युएसबी, सुपीन, रॅनबॅक्सी आदी औषध कंपन्यांना बसणार असल्याचे सांगितले जाते. तर एॅनल्जिन व डेनझिट या औषध गोळ्यांची फारशी विक्री होत नसल्याने उत्पादन कंपन्यांचे फारसे नुकसान होणार नसल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा