कोरची दलम या नक्षलवादी संघटनेचा सभासद असलेल्या विवेक तानाजी भोयन ऊर्फ बंडू याने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या समोर सोमवारी आत्मसमर्पण केले. यानंतर त्याला चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
गडचिरोली जिल्हय़ातील कोरची दलम ही नक्षलवाद्यांची संघटना असून बंडू भोयर हा या संघटनेत काम करीत होता. तो मुळचा वणी येथील असून त्याचे वडील वेकोलित चपराशी आहेत. दहावीत असतानाच बंडू घर सोडून निघून गेला होता आणि कोरची दलममध्ये पशासाठी सहभागी झाला होता. बंडूला संगणकाचे ज्ञान आहे. त्या आधारे तो संघटनेला गुप्त स्वरूपाची माहिती देत होता.
दोन वर्षांपूर्वी गोंदिया पोलिसांनी भास्कर ऊर्फ अक्षय ऊर्फ मनोहर कोरे (२५, रा. चंद्रपूर) याला अटक केली तेव्हा कोरे याने बंडू भोयरची माहिती गोंदिया पोलिसांना दिली होती. बंडू भोयर हा यवतमाळात वडगाव येथे रामदास शामराव शिंदे यांच्या घरी नाव बदलून भाडय़ाने राहत होता. तो जीवन कोल्हे या नावाने वावरत असल्याचे सचिन कोरे याने पोलिसांना सांगितले होते. त्याचवेळी गोंदियाचे पोलीस यवतमाळात रामदास िशदे यांच्याकडे चौकशीला आले होते, मात्र बंडू भोयर त्यापूर्वीच िशदे यांच्या घरून पसार झाला होता.
बंडू ज्या खोलीत राहत होता त्या खोलीची झडती घेतली असता त्याच्या खोलीत नक्षलवादी चळवळी संबंधीची कागदपत्रे सापडली होती. बंडू भोयरने कोरची दलममधूनही पळ काढून फरार झाला होता. पोलीस आपल्या सतत मागावर आहेत, याची जाणीव झाल्यामुळे आत्मसमर्पणाशिवाय इलाज नाही, हे लक्षात आल्याने अखेर बंडू भोयरने पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले.
बंडू भोयरच्या विरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील पोलिसांना बंडू भोयर हवा होता, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा