बँक ऑफ महाराष्ट्राच्या महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने युवकांसाठी दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत व सेंद्रीय शेती व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मुलाखतींद्वारे निवड केली जाणार आहे. सोमवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे. इच्छुकांनी शाळेचा दाखला, रहिवासी दाखला, ओळखपत्र, छायाचित्र, दारिद्रय़रेषेखालील दाखला यांच्या सत्यप्रती घेऊन शालिमार येथील नेहरू गार्डनजवळीत शाखेत प्रशिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास २० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of maharashtra free training camp farmar