विद्यापीठ मूल्यांकनातील गैरप्रकाराविषयी गंभीर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या धर्तीवरच उत्तपत्रिकांवर ‘बारकोड’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी परीक्षा मंडळाच्या आयोजित करण्यात आल्याच्या बैठकीत या उपाययोजनेवर निर्णय घेण्यात आला.
 उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात गैरप्रकार होत असल्याची प्रकरणे उघडकीस आली. विद्यार्थ्यांची ओळख लपविण्यासाठी उत्तरपत्रिकेवरील बैठक क्रमांक लपविण्यात येत असतो. मात्र, ही पद्धती फारशी उपयोगी ठरली नाही. विद्यार्थ्यांनी या पद्धतीवर उपायशोधून काढले आहेत.
उत्तरपत्रिकेवर परीक्षा क्रमांक, परीक्षा केंद्र अन्य माहिती दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांची ओळख पटवून घेणे कठीण नाही. त्यामुळे विद्यापीठासाठी नवीन पद्धतीचा मार्ग अवलंब करणे आवश्यक आहे.
 विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहिती विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. शालिनी लिहितकर यांनी आपल्या बहिणीचा पेपरफेरमूल्यांकन करताना तपासून तिला फायदा करून दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना दोषी ठरविले होते. अशी प्रकणे वारंवार घडू नये म्हणून त्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या मागणीने विद्यापीठात जोर धरला. त्याचे पडसाद रविवारी झालेल्या बैठकीत दिसून आले. कठोर उपाययोजनांची मागणी सदस्यांनी केली. उत्तरपत्रिकांवर बारकोड पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय चर्चेनंतर घेण्यात आला.
या निर्णयामुळे विद्यापीठांच्या उत्तरपत्रिकांवर बारकोड लागून नंतर त्या तपासण्यासाठी जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख पटविणे शक्य होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

Story img Loader