मुंबई व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या वयोगटातील महिलांवर हल्ला झाला आहे. काहींना एकटय़ा गाठून तर काहींवर भर गर्दीत हल्ला झाला आहे. या पाश्र्वभूमीवर महिलांची सुरक्षितता आणि सार्वजनिक जीवनातील त्यांना मिळणाऱ्या सुविधा याबाबत विविध वयोगटाच्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या तसेच गृहिणींची मते जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
मुंबईत प्रवास करणे हे कितपत सुरक्षित ठरते, यावर बहुतांश स्त्रियांनी या शहरावर विश्वास दाखवला आहे. कामा-व्यवसायानिमित्ताने रात्री उशिरापर्यंत प्रवास करणे अपरिहार्य असते. रेल्वे वा बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना या गोष्टीचा ताण जाणवतही नाही. मात्र रिक्षा, टॅक्सीमध्ये बसताना महिला काही गोष्टी लक्षात घेतात, अशी टिप्पणी वित्तीय व्यावसायिक आश्लेषा पै यांनी केली. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असताना ओळखीच्या जागी भीती वाटत नाही. मात्र अनोळखी, नवख्या जागी भीती वाटते, असा अनेकींचा सूर होता. छेडछाडीचे प्रकार- यात धक्काबुक्की करणे वा अचकट विचकट बोलण्यासारखे गैरप्रकार जितके निर्मनुष्य जागी होतात, तितकेच ते गर्दीच्या ठिकाणी होतात, याला सर्वच महिलांनी दुजोरा दिला.
आर्किटेक्ट मृदुला सावंत म्हणाल्या की, इतके गंभीर प्रसंग प्रत्येकीवर ओढवतातच, असे नाही. मात्र अशा घटनांमुळे मनात एका प्रकारची भीती बसते आणि ‘आपल्या बाबतीतही असं घडू शकते..’ असं वाटून जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा