जायकवाडीला पाणी देणे अशक्य
जायकवाडी या प्रकल्पाला मे ते जुल महिन्यात कोणत्याही परिस्थितीत पाणी देऊ शकणार नाही, अशी पाणीसाठय़ाची स्थिती आहे. म्हणून आत्तापासूनच काटकसरीने पाणी वापरण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
खुर्ची किंवा सोफ्यावर बसून पाणी पिणाऱ्यांनी पाण्याने हात धुणाऱ्यांनी प्रथम चिमणीच्या पिलाची चोच कोरडी आहे, याचे आधी भान ठेवावे, असे आपले सर्व जनतेला कळकळीचे व पोटतिडकीचे आवाहन आहे. या आवाहनाचा राज्यातील नागरिकांनी जरूर विचार करावा, असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी येथे एका वार्ताहर परिषदेत केले.
विधिमंडळाचे अधिवेशन आटोपून नागपूरहून सोलापूरला जात असतांना यवतमाळला थांबून ढोबळे यांनी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला त्यावेळी आयोजित वार्ताहर परिषदेत ढोबळे यांनी वरील आवाहन केले. राज्यात घेण्यात आलेल्या ६ लाख पाण्याच्या नमुंन्यापकी ८० हजार नमुने दूषित असल्याचे आढळून आल्याची माहिती यावेळी दिली.
पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी सरकार ११८ कोटी रुपये खर्च करते. घनकचरा व्यवस्थापन आणि गावातील घाण पाणी शुध्द करण्यासाठी राज्यातील ९४ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ९४ कोटी रुपये देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात ९ हजार ५०० गावे निर्मलग्राम झाली आहेत. यात सांगली, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे होण्याच्या मार्गावर आहे. नाशिक, पुणे, औरगांबाद विभागात पाण्याचे दुíभक्ष्य असल्याची माहिती त्यांनी दिली. अधिवेशनात फक्त पाच दिवस काम चालले,
याबाबत खेद व्यक्त करून दोन दिवसात वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, िहगोली, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद व सोलापूर येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषदेच्या माध्यमाने जनतेला योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. १० रुपयांचा तंबाखू , १२ रुपयाची सिगारेट, यावर मराठी माणूस खर्च करतो, परंतु ३ रुपये पाणीपट्टी भरत नाही, यावरही त्यांनी टीका केली.
सिमेंटचे दर वाढल्यामुळे योजनेच्या खर्चातही भरमसाठ वाढ झाली. नगरपालिका व महानगरपालिका यांनी १०० कि.मी.वरून पाणी वाहून आणण्याऐवजी स्वतचे बांध बनविले पाहिजे. ६ लाख नमुन्यातून ८० हजार नमुने दूषित आढळले. त्यावर उपाययोजना केल्यावर ४० हजार नमुने दूषितच राहिले, असेही ते म्हणाले. मराठवाडय़ास पाणी देण्यासाठी राज्यातील बांधकामास व उसाला दिले जाणारे पाणी थांबवू, असा इशाराही त्यांनी दिला.
औरांगाबाद येथे ४० गळती व सोलापूर येथे ३० टक्के पाणीगळती होत असल्याचेही ते म्हणाले. उमरगा, जालना, अंबर, अकोला, येथे पाणीशिस्त पाळली नसल्याने उद्योग, संस्थेत वाढ झाली नाही असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत संजय रणखांब, अरिवद वानखडे उपस्थित होते.
लोहारा पाणी पुरवठा योजनेस हिरवी झेंडी
लोहारा पाणी पुरवठा योजनेची दुसरी जागा निश्चित झाल्याने या योजनेस हिरवी झेंडी दाखविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे लोहारा वासियांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. राष्ट्रवादी कॉंगेसचे आमदार संदीप बाजोरीया यांनी लोहारा पाणी पुरवठा योजनेसाठी जागा मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले होते. लवकरच या योजनेच्या निविदेला मंजुरी देण्यात येईल. यवतमाळातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे ग्राहकांची पाणी वापराची पध्दत ‘आबादी ही आबाद ‘ म्हणजे जास्त पाणी वाया घालवितात.