सराफ बाजारात सायंकाळच्या सुमारास बाळासाहेब महादेव केंद्रे (राहणार बायजाबाई जेऊर) यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी सलमान अब्दूल गफ्फार सय्यद याला ताब्यात घेतले. दुसरा एकजण फरारी आहे, त्याचे पुर्ण नाव समजले नाही.
मोटारसायकल अचानक बंद केल्यावरून हा प्रकार झाला असल्याची माहिती मिळाली. केंद्रे हे सराफ बाजारातून चालले होते. त्यांच्या मोटारसायकलच्या समोर एक मोठी गाडी आली, त्यामुळे त्यांनी आपली गाडी बंद केली. त्यांच्या मागे असणाऱ्या सलमान व त्यांच्या बरोबर असणाऱ्या आणखी एकाने गाडी बंद का केली असे विचारून केंद्रे यांना अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. केंद्रे हे प्रवचने करतात असे समजते. आसपासच्या लोकांनी त्यांना सोडवले. त्यांना दुखापत झालेली असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी सलमान याला ताब्यात घेतले. दुसरा फरार झाला. रात्री या प्रकरणात कोतवाली पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा