केवळ दहावीच्या परीक्षेतच नव्हे, तर पुढील जीवनातही उज्ज्वल प्रगती करून यशस्वी व्हा, असे प्रतिपादन आमदार मंगेश सांगळे यांनी लोकसत्ता यशस्वी भव उपक्रमात आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळेत केले. भांडुप पूर्व विभागातील विद्यावैभव शिक्षण मंडळाच्या शिवाई विद्यामंदिरात बुधवारी लोकसत्ता यशस्वी भव उपक्रमाअंतर्गत दहावीच्या मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक आमदार मंगेश सांगळे, संस्थेच्या सचिव गौरी भोईर, कोषाध्यक्ष मयुरेश भोईर, मुख्याध्यापिका संध्या पांडे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवाई मंदिरासह केणी विद्यालय, सरस्वती विद्यालय, जनता विद्यालय, विक्रोळी विद्यालय आणि विद्यामंदिर शाळेतून यंदा दहावीच्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आमदार सांगळे यांच्यातर्फे ‘यशस्वी भव’ पुस्तिका विनामूल्य प्रदान करण्यात आल्या. बालमोहन विद्यामंदिरच्या अखिल भोसले सरांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. शिक्षिका वर्षां दीक्षित यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेऊन ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाची उपयुक्तता विषद केली. यावेळी सर्व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा