जिल्हय़ात मागील दोन महिन्यांपासून गुन्हय़ांचे प्रमाण मोठय़ा संख्येने वाढले आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या निष्क्रिय कारभारामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याने खुनासारख्या गंभीर घटनांची मालिका थांबवण्याचे नाव घेत नाही. अवैध धंदे राजरोस सुरू असून चोऱ्या व दरोडय़ांमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांची तात्काळ बदली करावी, या मागणीसाठी मनसेने जिल्हाभर लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले.
पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक न राहिल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे.
मंगळवारी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अशोक तावरे, गोविंद वणवे, वर्षां जगदाळे अंबाजोगाईत सुनील जगताप, केशव ढगे यांच्यासह तालुका तहसीलसमोर मनसेचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण करून बदलीची मागणी केली.

Story img Loader