शुक्रवारी कल्याणमध्ये हार्मोनियमची मैफल
कल्याण परिसरातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्पंदन’ संस्थेने या उपक्रमासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक ‘आदित्य ओक’ व सारेगमफेम ‘सत्यजित प्रभू’ यांचा सहभाग असलेला ‘बेमिसाल बाजा’ ही हिंदी गाण्यांवर आधारित मैफल आयोजित केली आहे. शुक्रवार १३ जून रोजी रात्री ८.३० वाजता अत्रे नाटय़गृहात हा कार्यक्रम होणार आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २००५ मध्ये कल्याणमध्ये एकत्र आलेल्या कल्याणमधील तरुणांनी पुढे स्पंदन या संस्थेद्वारे शैक्षणिक मदतीचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. या उपक्रमासाठी निधी संकलनाच्या हेतूने वर्षभरात दोन दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात.
गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. गेल्या वर्षी ‘स्पंदन’च्या वतीने वैद्यकीय अभियांत्रिकीसह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क म्हणून सुमारे एक लाख ७० हजारांचा निधी देण्यात आल्याची माहिती कार्यकर्ते प्रशांत दांडेकर यांनी दिली.

Story img Loader