पाण्यातील हायड्रोजनचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे प्रयोग शास्त्रज्ञांमार्फत सुरू आहेत. त्यात यश आल्यास ऊर्जेचा प्रश्न लवकर सुटेल, अशी माहिती भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. के. आर. एस. चंद्रकुमार यांनी दिली.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित इन्स्पायर शिबिरात डॉ. चंद्रकुमार बोलत होते. ते म्हणाले, की ऊर्जाक्षेत्रात महत्त्वाचा पर्याय सौरऊर्जेचा आहे. परंतु सिलिकॉनवरील प्रक्रिया महागडी असल्यामुळे सामान्यांना ती परवडत नाही. सिलिकॉनऐवजी धातूंचे सूक्ष्मकण वापरून अधिक सौरऊर्जा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या २० वर्षांत कमी खर्चात सौरऊर्जा मिळविणे शक्य होईल. पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आहे. पाण्यातील हायड्रोजन वेगळे केल्यास त्याचा ऊर्जा म्हणून वापर करता येईल. पृथ्वीवरील खनिजसंपत्ती मर्यादित असल्याने पर्यायी व शाश्वत ऊर्जास्रोताचा शोध सुरू आहे. त्यातून पाणी हेच इंधन म्हणून वापरण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचे प्रयोग सुरू असल्याचे ते म्हणाले.
नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आमूलाग्र शोध
विज्ञानातून शोध व शोधातून तंत्रज्ञानाची निर्मिती होते. नॅनो टेक्नॉलॉजीमुळे अनेक नवनवीन शोध लागत असल्याची माहिती डॉ. रिटा जॉन यांनी दिली. इन्स्पायर शिबिरात समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. नॅनो टेक्नॉलॉजीचे मानवी जीवन व पर्यावरणावर काय परिणाम होतील, याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सजीवसृष्टीवरील परिणामांचा अभ्यास नॅनो टेक्नॉलॉजीच्या अभ्यासास पूरक ठरणार आहे. चेन्नई विद्यापीठात नॅनो टेक्नॉलॉजीच्या नकारात्मक परिणामांवर संशोधन सुरू आहे. जपान व भारताच्या वतीने हे संशोधन सुरू असून यासाठी केंद्र सरकारने एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केल्याचेही त्यांनी सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष अरिवद सोनवणे, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, प्राचार्य जयप्रकाश दरगड, डॉ. रामकृष्ण लड्डा, प्रकाश िशगडे, डॉ. अजय महाजन, प्रा. भगवान तांबाळकर आदी उपस्थित होते.
आकाशनिरीक्षणाची संधी
रात्रीच्या निरभ्र आकाशातले फुललेले चांदणे, लुकलुकणारा शुक्र तारा आणि चंद्राच्या कला पाहण्याचा योग तसा दुर्मिळच. हा योग खगोलशास्त्रज्ञ डॉ. अरिवद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या प्रात्यक्षिकात टेलिस्कोप दुर्बणिीमधून आकाशनिरीक्षण संधीतून उपलब्ध करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आकाशनिरीक्षणासह चंद्रावरील कृष्णविवरे अभ्यासली. दयानंद, राजर्षी शाहू व महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.

Story img Loader