बसमध्ये मोबाईलवर जोरजोरात बोलणे अथवा मोठय़ा आवाजात संगीत ऐकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय बेस्टने घेतला खरा. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेलीच नाही. उपद्रवी प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्याचे अधिकार बसवाहकांना देण्यात आले आहेत.  परंतु हे आदेश वाहकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत. त्यामुळे आजही बसगाडय़ांमध्ये मोठय़ा आवाजात गाणी ऐकणी, मोबाईलवर जोरजोरात संभाषण करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.
बसेसमध्ये मोबाइलवर बोलण्यास अथवा जोरात गाणी लावण्यावर बंदी घालण्याचा निर्णय बेस्टने एप्रिलच्या सुरुवातीला घेतला. अशा प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्याचे अधिकारही बसवाहकांना देण्यात आले होते. परंतु दोन आठवडे उलटले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. मोबाईलवर जोरात बोलणाऱ्या अथवा गाणी ऐकणाऱ्याविरुद्ध वाहकाकडे तक्रार केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश आपल्याला देण्यात आलेले नाहीत, असे वाहकांकडून सागण्यात येते. उपद्रवी प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सर्व बसवाहकांना देण्यात आले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसेल तर बसवाहकांना पुन्हा एकदा आदेश देण्यात येतील, असे बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा