सूर्योदय युवा प्रतिष्ठानच्या विलासराव देशमुख स्मृती वक्तृत्व स्पध्रेस ४ जिल्हय़ांतून चांगला प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांच्या ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पध्रेच्या उद्घाटन सोहळय़ात विलासरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
बी. रघुनाथ सभागृहात माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सोहळय़ास महापौर प्रताप देशमुख, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती विजय जामकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफान खान, बंडू पाचिलग, प्राचार्य डॉ. बी. यू. जाधव, प्राचार्य डॉ. अविनाश सरनाईक, प्राचार्य संध्या रंगारी, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, नीलेश चव्हाण यांची उपस्थिती होती. ‘सूर्योदय’चे अध्यक्ष रवींद्र पंतगे यांनी प्रास्ताविकात विलासरावांच्या वक्तृत्वाच्या पलूंवर भर देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यपातळीवर स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला.
महापौर देशमुख यांनी राजकारणासह सर्वच क्षेत्रांत विलासरावांनी कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळेच त्यांचे नाव लौकिकास्पद ठरले, असे नमूद केले. आमदार मीरा रेंगे, संजय देशमुख, अभिजित देशमुख, बाळासाहेब देशमुख यांचीही भाषणे झाली. माजी खासदार रेंगे पाटील यांनी मराठवाडय़ाच्या विकासासाठी विलासरावांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. सुनील मोडक यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत मकरंद यांनी आभार मानले. काँग्रेस तालुकाध्यक्ष पंजाब देशमुख, बाळासाहेब रेंगे, सुनील देशमुख, हसीब उर रहेमान, नागेश सोनपसारे, विलास पानखडे, संतोष आसेगावकर, रमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रवीण चौधरी, सुनील चाटुफळे, अनिल देशमुख, दिगंबर खरवडे आदींनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा