राष्ट्रीयस्तरावर आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटला भारतीय आर्थिक विकास आणि संशोधन संघटनेच्यावतीने भारतीय आरोग्य देखरेख उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आला.
माजी केंद्रीय मंत्री, राज्यपाल भीष्म नारायण सिंग यांच्या हस्ते  नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरमध्ये झालेल्या समारंभात ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. अनुप मरार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी जी.व्ही.जी. कृष्णमूर्ती,
जोगिंदर सिंग, न्या. बादशाह खान, मेजर वेद प्रकाश, प्रो. एस.एस. भाकरी, डॉ. मिलिंद पांडे आदी उपस्थित
 होते.
या यशाबद्दली नायर सन्स ग्रुपचे अध्यक्ष उदय भास्कर नायर, रवी नायर हॉस्पिटलच्या संचालक डॉ. उषा नायर यांनी ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या सदस्यांचे अभिनंदन केले.

Story img Loader