वसमत येथील प्रसिद्ध सवरेदयी विचारवंत व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त १ ते ७ जानेवारीपर्यंत ‘विचारमंथन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे.
वसमत येथील महात्मा गांधी विद्यालयात या ‘विचारमंथन’ शिबिरात सवरेदयी विचारवंत अमरभाई उपस्थित राहणार आहेत. ते ‘आजचा भारत’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
१ जानेवारीला ‘मराठवाडय़ाचा सिंचन अनुशेष’ या विषयावर निवृत्त अधिकारी या. रा. जाधव, २ जानेवारीला ‘नदी जोड प्रकल्प’ या विषयावर जयंत वैद्य, ३ जानेवारीला ‘सेंद्रिय शेतीप्रयोग’, ४ जानेवारीला ‘मराठवाडय़ाचा अनुशेष’ यावर डॉ. कुरूलकर, ५ जानेवारीला ‘निवडणूक सुधारणा’ यावर पन्नालाल सुराणा यांचे व्याख्यान होणार आहे. दररोज सायंकाळी पाच वाजता बर्हिजी नाईक विद्यालयात ही व्याख्याने होणार आहेत.
६ व ७ जानेवारी रोजी कार्यकर्त्यांचे शिबिर होणार आहे. यामध्ये सवरेदयी गांधीवादी व समाजवादी विचारवंत उपस्थित राहणार आहेत. 

Story img Loader