श्री सत्यसाई सेवा संघटना, श्री सद्गुरू काशीकर महाराज संस्था यांच्या विद्यमाने १४ ते २० फेब्रुवारी दरम्यान यवतमाळ येथे ऋतुराज महाराज यांचे श्रीमद्भागवत कथापर्व आयोजित केले आहे. ‘स्त्रीशक्ती आणि महात्म्य’ या विषयावर भागतवकथा होणार असल्याची माहिती डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी सोमवारी डॉ. नंदूरकर विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या माध्यमातून स्त्रीशक्तीचा विकास व्हावा व महिलांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, हा महत्त्वपूर्ण हेतू महाराजांचा आहे. ऋतुराज महाराज यांनी यवतमाळात कथा करायची आहे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी नवीन विषय असावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा आदर करीत स्त्रीशक्ती आणि महात्म्य या विषयावर यावेळी धार्मिक विवेचन होणार असल्याची माहिती नंदूरकर यांनी दिली.
यावेळी काशीकर महाराज संस्थानचे चंद्रशेखर नेमाणी, अॅड. स्मिता तेलंगे, राजश्री गांधी, प्रेरणा राशतवार, उज्ज्वला भाविक, विद्या खडसे, लीना नंदूरकर, नीलिमा मंत्री, ज्योती चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या कथापर्वाच्या आयोजनात शहरातील विविध संस्थांचा सहभाग आहे. तसेच १८ फेब्रुवारीला अजित कडकडे यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तसेच स्थानिक कलावंतांनाही यात संधी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे डॉ. नंदूरकर यांनी सांगितले.
यात श्री स्वामी समर्थ, अध्यात्म केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग, गुरुदेव सेवा मंडळ, संस्कार कलश एकता ग्रुप, अंकुर साहित्य संमेलन, स्त्रीमुक्ती मंच, मराठी महिला साहित्य संघ, कुणबी समाज महिला मंडळ, अथर्वशीर्ष मंडळ, तेजस्विनी कन्या छात्रावास, सिंधी महिला मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, वनिता वासवी क्लब, सखी ब्राह्मण महिला मंडळ, ब्राह्मण महिला मंडळ, निवृत्त अभियंता मित्रमंडळ, कन्यका परमेश्वरी पतसंस्था, जिल्हा परिषद सदस्य महिला संघ, सावित्रीबाई फुले समाजसेवी संस्था, ओम साई गीता महिला मंडळ, इनरव्हिल क्लब, जेसिरेट िवग, लॉयन्स क्लब, स्मार्ट अकॅडमी, निमा महिला िवग, आयएमए महिला िवग यासह विविध सामाजिक, आध्यात्मिक व स्वयंसेवी संघटनांचा सहभाग राहणार आहे. या भागवत कथापर्वाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

Story img Loader