संयुक्त वन व्यवस्थापन योजनेतील त्रुटी आणि उणिवा दूर करून स्थानिकांचे जंगलाशी असणारे नाते अधिक दृढ करणारा लोककेंद्री प्रकल्प ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यातील भांगवाडी येथे कार्यान्वित झाला आहे. वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत बुधवारी भांगवाडीत पार पडलेल्या एका बैठकीत या निर्णयाची औपचारिक घोषणा करण्यात आली. भांगवाडी ग्रामस्थ आणि श्रमिक मुक्ती संघटनेने याकामी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील हा एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.
या नव्या योजनेनुसार आता वाडीतील प्रत्येक घराने जंगलातील सर्व झाडे जोपासना करण्यासाठी वाटून घेतली आहेत. भागवाडीत एकूण ६५ घरे असून त्यांच्या वाटय़ास ६५ हेक्टर जंगल आले आहे. या लोककेंद्री व्यवस्थापनात आता जंगलातील चोरी, वृक्षतोड तसेच वणवा रोखण्याचे अधिकार ग्रामस्थांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नव्या वृक्षांची लागवड, त्यातून मिळणारे उत्पन्न याचे व्यवस्थापनही ग्रामस्थ करणार आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी बंधाऱ्यातील गाळ उपसणे, वनतळी खोदणे आदी योजनाही ग्रामस्थांच्या पुढाकाराने राबविल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा