पंचवटीतील दिंडोरी नाका परिसराचे सुशोभीकरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, दिंडोरी रस्त्याचे दादासाहेब गायकवाड मार्ग असे नामकरण करावे, प्रभाग क्रमांक नऊमधील फुलेनगर परिसरातील बाललोक सार्वजनिक वाचनालयासाठी ९९ वर्षांच्या करारावर सभागृह वाचनालयाच्या नावे करावे आदी मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
निवेदनात महासंघाने विविध मागण्यांचा उल्लेख केला आहे. नाशिकरोड (जेलरोड) मधील लोककवी वामनदादा कर्डक यांचे अर्धवट असलेले स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे, उपनगरमधील अम्रपालीनगर येथील पूर्ण झालेले घरकुल लवकरात लवकर पात्र व्यक्तीस वाटप करावे, फुलेनगर परिसरातील मायको हौसिंग बोर्डजवळील मायको दवाखाना नागरिकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी नऊपर्यंत सुरू ठेवण्यात यावे, प्रभाग ३८ मधील हॅपी होम कॉलनीत रिकाम्या जागेतील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे ही जागा स्वच्छ करण्यात यावी, पंचवटी विभागातील भुयारी योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या गटारींचे काम अतिशय   निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
या गटारी स्वच्छ न केल्यामुळे गटारींमधील घाण पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. फुलेनगर परिसरातील बालकांच्या लोकसंख्येनुसार बालक शौचालय बांधून मिळावे, हौसिंग बोर्डजवळ त्रिशरण कमान बांधावी, नाशिक शहरातील ज्या ठिकाणी शाळा असतील, त्या ठिकाणी गतिरोधक तयार करावेत, वडाळा गावातील अपूर्ण  रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करावे.
पुरेसा पाणीपुरवठा करावा, स्वच्छता मोहीम राबवावी, पश्चिम विभागातील मिलिंदनगरमध्ये गटारी, कमी पाणीपुरवठा, बंद पथदीप, घाणीचे साम्राज्य अशा समस्या असून त्या त्वरित सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा