नव्या वर्षांची पहाट ‘सूरमयी’ व्हावी यासाठी विविध संस्थाच्यावतीने शहर परिसरात पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले असताना आता काही संस्थांनी भाऊबीज पहाटही सुरमयी करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गंगापूर रस्त्यावर आयोजित पंडित शौनक अभिषेकी यांची मैफल.
माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे व माजी नगरसेवक प्रा. सुहास फरांदे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पंडित शौनक अभिषेकी यांच्या गंधाळलेल्या स्वरांनी भाऊबीजेची पहाट होणार आहे. गुरूवारी पहाटे पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानात हा कार्यक्रम होईल. रसिकांनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन फरांदे यांनी केले आहे. दरम्यान, गोदाश्रध्दा फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोदा श्रध्दा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजता कॉलेजरोडवरील श्रध्दा पेट्रोलपंपाजवळ हा कार्यक्र म होईल. त्यात सारेगम फेम उर्मिला धनगर, राहुल सक्सेना व कौशिक देशपांडे सहभागी होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा