कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत असलेल्या पण भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडत असलेल्या मोहिली व आंबिवली या दोन गावांनी या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांमध्ये अडीच हजार मतदार आहेत.
पालिका स्थापन झाल्यापासून या गावांना महापालिका प्रशासनाने रस्ते, वीज, गटारे, प्रसाधनगृहे आदी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. या गावांसाठी आलेला निधी पालिका अधिकाऱ्यांनी परस्पर हडप केला. त्यामुळे हा बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे गाव बचाव संघर्ष समितीचे गणेश म्हात्रे यांनी सांगितले. प्रांत अधिकारी धनंजय सुकवडेकर यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले.
अधिकाऱ्यांनी पालिकेतर्फे विकासाचे चांगले पॅकेज देण्याचा विचार केला जाईल, असे सांगितले. पण ग्रामस्थ बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. यापूर्वीच्या महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांवरही येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दोन गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत असलेल्या पण भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडत असलेल्या मोहिली व आंबिवली या दोन गावांनी या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 15-04-2014 at 06:46 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandilok sabha constituency election boycott by two villages